dr.satish best web design developer for mac

अत्‍याळ ग्रामपंचायत :

गडहिंग्‍लज तालुक्यापासून 4 किमी अंतरावर वसलेले अत्‍याळ हे आमचं गांव. सुंदर व सुसज्ज असे आमचं गाव. गावाच्या शेजारी गिजवणे, बेळगुंद्री, इंचनाळ, ऐनापूर, कौलगे ही गावे आहेत. गावाकडील पश्चिमेकडे मंगाई डॅम हा मोठा तलाव आहे. तसेच गावात जल स्‍वराज्‍य प्रकल्‍पाअंतर्गत हिरण्‍यकेशी नदीतुन गावासाठी पाणी आणले आहे. या पाण्‍याचा वापर पिण्‍यासाठी केला जातो. त्‍यामुळे गावातील लोकांचा पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्न सुटला आहे. हे नदीतुन आणलेले पाणी साठविण्‍यासाठी गावामध्‍ये दोन मोठया टॉक्‍या आहेत. एका टॉकीची क्षमता 75000 हजार लीटर इतकी असुन दुस-या टॉकीची क्षमता 90000 हजार लीटर इतकी आहे. त्‍यामुळे गावास मुबलक प्रमाणात पाणी उपलब्‍ध होते. ग्रामपंचायतीने म.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत रस्‍तांच्‍या दुतर्फा बाजुस झाडे लावलेली आहेत. तसेच ग्रामपंचायतीने गावठाणात 1000 हजार झाडांची लागवड केलेली आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 1952 साली झाली. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. गावाची लोकसंख्या 2672 असून गावातील घरांची लोकसंख्या 872 आहे. गावामध्ये 642 कुटुंबे वास्तव्य करत असून ती 3 वार्डमध्ये विभागली गेली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर आठ सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. त्यांच्या मार्फत ग्रामपंचायतीचा कारभार पहिला जातो.

सरपंच
सौ. वैशाली विकास पाटील

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. पृथ्‍वीराज रमेश पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. तुकाराम यादवराव हणमंते

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Atyal Grampanchayat
A/p - Atyal Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416502

CONTACTS
Phone :

Office :02327 – 240431